उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप घ्या
आहार व ब्रम्हचर्या प्रमाणे झोप ही देखील मानवी आयुष्याचा एक आधार स्तंभ आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह नाही. झोपेचे रहस्य उघडण्याचे प्रयत्न अनेक वर्षापासुन शास्त्रज्ञाद्वारे सुरू आहेत. अल्फा, बीटा, डेल्टा, थिटा यासारखे कित्येक झोपेचे प्रकार त्यांनी शोधुन काढले आहेत. मात्र झोप ही नेमकी कशी असते हे शब्दात सांगण्यापेक्षा ती अनुभवण्यातच खरी मजा असते. अंथरूणावर अंग सरळ सोडुन दयावे, बाहय जगाच्या सर्व संवेदना विसरून जाव्या,आणि अगदी आनंदाने निद्रादेवीच्या कुक्षीत सामावुन जावे................यासच निद्रा सुख म्हणतात. परंतु सध्याच्या धकाधकीच्या व तणावपुर्ण वातावरणात कित्येक लोकांच्या झोपेचे खोबरे होत आहे, ते टाळण्यासाठी हा प्रपंच...
चांगली झोप येण्यासाठी
ऽ झोपण्यापुर्वी चहा, कॉफी, सारखे पदार्थ घेण्याचे टाळावे.
ऽ रात्रीच्या जेवणात तिखट मसालेदार पदार्थ घेण्याचे टाळावे.
ऽ झोपण्याची जागा प्रसन्न असावी, तेथे गोंधळ, कोलाहल नसावा.
ऽ झोपण्या पूर्वी व्यायाम करू नये.
ऽ झोपण्यापुर्वी भितीदायक वाचन किंवा चलचित्रे पाहण्याचे टाळावे.
ऽ दररोज ठराविक वेळी झोपण्याचा प्रयत्न करावा.
ऽ झोपण्यापुर्वी शवासन,व ध्यान धारणा करावी, मन ताण तणाव रहीत करण्याचा प्रयत्न करावा.
ऽ झोपण्याच्या पुर्वी मंद संगीत ऐकावे किंवा मंद सुगंधाचा प्रयोग करावा.
ऽ झोपण्यापुर्वी हात पाय थंड पाण्याने धुवावे.
ऽ झोपण्यापुर्वी दिवसभरातील सकारात्मक गोष्टींचा विचार करावा.
ऽ कपभर गोड दुधामध्ये चिमुटभर जायफळ कालवुन ते दुध प्यावे शांत झोप येते.
ऽ डोक्यावर खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल मालीश करून झोपावे
ऽ एरंडाचे तेल डोक्याला चोळून झोपावे शांत झोप लागते.
ऽ ब्राम्ही, शंखपुष्पी, जटामांसी, आवळा इत्यादी वनौषधींचा आयुर्वेदीक वैद्यांच्या सल्ल्याने लाभ घ्यावा.
ऽ शिरोधारा, अभ्यंग इ. पंचकर्म आयुर्वेदीक वैद्यांच्या सल्याने करून घ्यावे.
ऽ रात्री झोपण्यापुर्वी तळपायांना एरंडीचे तेल कासीसाच्या वाटीने चोळावे यामुळे शांत झोप येते.
धन्यवाद.

No comments:
Post a Comment